Salman Khan In Dabang 4| बॉलीवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी तो ‘टायगर 3′ या सिनेमात दिसला होता. यात सलमानसह अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती. यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान साजिद नाडियाडवाला यांच्याबरोबर एक बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट सुरू करणार अशी चर्चा आहे.
सलमान खान ‘दबंग 4’ मध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. स्वत: अरबाज खाननेही याची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानने ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटलीची भेट घेतली असून तो त्याच्याबरोबरच ‘दबंग ४’ सुरू करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र एका मुलाखतीत अरबाजने अॅटलीची भेट घेतली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अरबाज म्हणाला, “याबद्दल अधिकृत व्यक्तीकडून वक्तव्य येत नाही तोपर्यंत लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवणं योग्य नाही.” Salman Khan In Dabang 4|
याबरोबरच या मुलाखतीमध्ये अरबाज खानने सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेची भूमिका करण्यास फार उत्सुक आहे. शिवाय योग्य वेळ येताच याबद्दल घोषणा करणार असल्याचेही स्पष्ट केले. परंतु याबाबत सध्या तरी अधिकृत घोषणा होणार नसल्याचे दिसत आहे. Salman Khan In Dabang 4|
दरम्यान, 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘दबंग’ चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 410 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटाचे 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यातील ‘दबंग 2’चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. दबंग 4 व्यतिरिक्त सलमान शाहरुख खानसोबत ‘टायगर व्हर्सेस पठाण’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘द बुल’ या सिनेमात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा: