नेवासा – हॉटेल व्यवसायिकाला खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार स्वप्निल ज्ञानदेव गरड (रा.सौंदाळा) याच्यावर काल नेवासा पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुदबुद्दीन हसूलाल शेख (रा.देवगाव, ता. नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या हॉटेलवर काय धंदे चालतात? तुम्हाला जर तुमचे हॉटेल चालवायचे असेल तर तुम्ही मला महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा मी तुमचे हॉटेल चालू देणार नाही अशी भिती घालून खंडणीची मागणी केली होती.
स्वप्निल गरड हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी खंडणी मागणीचे दोन गुन्हे, शासकीय मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत एक गुन्हा, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एक गुन्हा व चोरीचा एक गुन्हा असे एकूण पाच गुन्हे दाखल आहे.