Tik-Tok banned | America – टिक-टॉक या व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे विधेयक अमेरिकेच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहामध्ये मंजूर करण्यात आले आहे. टिक-टॉक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अमेरिकेतील युवकांमध्ये, त्यातही लहान मुलामध्ये विशेष लोकप्रिय आहे. इतर देशांपाठोपाठ आता अमेरिकेतही टिक-टॉकवर बंदी घालण्यात आली आहे.
सर्वात पहिल्यांदा २०२० मध्ये भारताने टिक-टॉकवर बंदी घातली आहे. टिक-टॉक हे चिनी ऍप असून याच्या माध्यमातून लोकांबद्दलची वैयक्तिक माहिती आणि हेरगिरी केली जात असल्याचे उघड झाल्यावर या ऍपवर भारतात बंदी घालण्यात आली होती.
अमेरिकेच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहात टिक-टॉकवर बंदी घालण्याच्या विधेयकाच्या बाजूने ३५२ तर विरोधात ६५ मते पडली. आता अधिक विचारासाठी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाकडे हे विधेयक पाठवण्यात येणार आहे.
आणि नंतर अध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्यात येणार आहे. हे विधेयक भारतीय वंशाचे अमेरिकेच्या संसदेतील सदस्य राजा कृष्णमूर्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे माईक गॅलेग यांनी मांडले होते.