Suman Kumari female sniper। भारतीय लष्कर आणि विशेष दलात स्नायपर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. सीमेवर सुरू असलेले युद्ध असो, सर्जिकल स्ट्राइक असो, शहरातील ओलिसांची परिस्थिती असो किंवा जंगलातील युद्ध असो, प्रत्येक ठिकाणी स्नायपरने अनेक किलोमीटर दूरवरून लक्ष्य वेधून शत्रूंवर गोळ्या झाडल्या आहेत.
बऱ्याचदा आपण अनेक चित्रपट, वेब सिरीज इत्यादींमध्ये एका पुरुषाला स्निपरची भूमिका करताना पाहिले आहे. ते दृश्य पाहताना या भूमिकेसाठी स्त्री कलाकाराला घेता येईल असा प्रश्न क्वचितच कोणाच्या मनात आला असेल, पण आजची success story वाचून तुम्हाला आपल्या देशाच्या मुलींचा अभिमान वाटेल. आज आम्ही तुमच्यासाठी बीएसएफच्या पहिल्या महिला स्निपरचा थरारक अन् प्रेरणादायी प्रवास घेऊन आलोय…
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तुंगल खोऱ्यातील कुतल गावातील दिनेश ठाकूर यांची मुलगी सुमन कुमारी यांची बीएसएफमध्ये उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यांनतर त्यांनी स्निपर प्रशिक्षणासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली. सुमन हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील एका साध्या पार्श्वभूमीतून आल्या आहेत. त्यांचे वडील इलेक्ट्रीशियन आहेत आणि आई गृहिणी आहे.
बीएसएफची पहिली महिला स्नायपर्स Suman Kumari female sniper।
इंदूरमधील सेंट्रल आर्मामेंट आणि कॉम्बॅट स्किल्स स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेली सीमा सुरक्षा दलाची तुकडी सध्या चर्चेत आहे. कारण अशा खडतर प्रशिक्षणानंतर बीएसएफची पहिली महिला स्निपर तयार झालीय. इंदूरमधील बीएसएफ कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आठ आठवड्यांच्या स्नायपर्स प्रशिक्षण कोर्समध्ये एसआय सुमन कुमारी या एकमेव महिला होत्या. त्या बीएसएफच्या पंजाब युनिटमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहे. स्निपर कोर्स पूर्ण झाल्यानंतर, बीएसएफने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करून पहिल्या महिला स्नायपर्सची माहिती शेअर केली.
अत्यंत खडतर प्रशिक्षणानंतर हे स्निपर एसएसजीसह इतर तोफांसह निर्धारित अंतरावरून अचूक लक्ष्य वेधण्यात सक्षम आहेत. इतकंच नाही तर ओळख लपवून अत्यंत कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केलं जातं. ते तीन किलोमीटरहून अधिक अंतरावरून शत्रूवर अचूक मारा करण्यास सक्षम आहेत.
ताशी 3,200 किमी वेग
क्रॉसहेअरमध्ये ताशी 3,200 किमी वेगाने श्वास रोखून आपलं लक्ष्य गाठणे हा सोपा खेळ नाही. बीएसएफच्या पहिल्या महिला स्निपर एसआय सुमन कुमारी यांनी हे केले. सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स, इंदूर येथे आठ आठवड्यांच्या कठोर बीएसएफ स्निपर कोर्समध्ये ‘इन्स्ट्रक्टर ग्रेड’ मिळवणारी सुमन कुमारी ही पहिली महिला आहे.
प्रशिक्षणात 56 पुरुषांपैकी फक्त महिला Suman Kumari female sniper।
सुमन कुमारी या 2021 मध्ये BSF मध्ये सामील झाल्या. जेव्हा त्यांना सीमापार स्निपर्स हल्ल्याचा धोका जाणवला तेव्हा त्या पंजाबमध्ये एका प्लाटूनचे नेतृत्व करत होती. यानंतर, त्यांनी निर्धाराने स्निपर कोर्ससाठी स्वेच्छेने अर्ज केला आणि त्याच्या वरिष्ठांना पत्र लिहिले. सुमनच्या निर्धाराने प्रोत्साहित होऊन तिच्या वरिष्ठांनी तिला लगेच पुढे जाण्याची परवानगी दिली.
CSWT IG भास्कर सिंग रावत यांनी सुमन कुमारो विषयी बोलताना, “56 पुरुषांमध्ये ती एकमेव महिला होती आणि तिने प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. आम्हाला आशा आहे की आणखी महिला भर्ती करणाऱ्या हा कोर्स करतील.”
कमांडो प्रशिक्षणानंतरचा सर्वात कठीण अभ्यासक्रम
रावत म्हणाले, “असाधारण कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना अल्फा आणि ब्राव्हो ग्रेडिंग मिळते, परंतु ‘इन्स्ट्रक्टर ग्रेड’साठी वेगळी स्क्रीनिंग चाचणी घेतली जाते. जी चाचणी सुमनने मिळवली आहे. भविष्यात इतर महिलांना पुढे येण्यासाठी हे प्रेरणादायी ठरेल. ” . कमांडो प्रशिक्षणानंतर सर्वात कठीण अभ्यासक्रम त्यापैकी हा एक आहे. दरम्यान, हेच कठीण प्रशिक्षण घेऊन सुमन आता इन्स्ट्रक्टर म्हणून नियुक्त होण्यास पात्र बनल्या आहेत.