Vijay Shivtare । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतायेत. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघीही एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभ्या राहणार असल्याच्या चर्चां रंगात आहेत. तर दुसरीकडे येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामतीत विजय शिवतारे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विजय शिवतारे यांचे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम नाही करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं ते म्हणाले आहे. यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Vijay Shivtare । वृत्त माध्यमांशी बोलतांना बनेमक काय म्हणाले विजय शिवतारे
‘विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, अ विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेणार आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.’ असेही ते म्हणाले आहे. विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे यातून दिसत आहे.
Vijay Shivtare । शरद पवार यांच्या बाबत बोलतांना विजय शिवतारे म्हणाले
आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी भेटीगाठी होतात, मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप 10 हजारांपेक्षा जास्त ‘नमो योद्धा’ तैनात करणार; ‘ही’ असेल जबाबदारी