Gautam Gambhir । भाजप नेते आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलीय. गौतमने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये,” मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेन. “अशी विनंती त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे केलीय.
पंतप्रधान आणि गृमंत्र्यांचे आभार Gautam Gambhir ।
गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. गौतमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक ट्विट करत,”मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद.’ असेही म्हटले आहे.
I have requested Hon’ble Party President @JPNadda ji to relieve me of my political duties so that I can focus on my upcoming cricket commitments. I sincerely thank Hon’ble PM @narendramodi ji and Hon’ble HM @AmitShah ji for giving me the opportunity to serve the people. Jai Hind!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 2, 2024
दरम्यान, आता पूर्व दिल्लीतून भाजप कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार हे पाहणे गरजेचे आहे. मात्र आता या जागेवर अभिनेता अक्षय कुमारला पक्षाकडून तिकीट देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
पहिली यादी येण्यापूर्वीच गौतमची ‘इलेक्शन रिटायरमेंट’! Gautam Gambhir ।
गौतम गंभीरने निवडणूक न लढवण्याचा निर्णय अशा वेळी घेतली ज्यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत ज्या जागांवर पक्ष आधीच विजयी झालेला अशाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अशी चर्चा सध्या आहे.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसारख्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश असू शकतो. भाजपच्या पहिल्या यादीत ज्या जागांची घोषणा होऊ शकते त्यात वाराणसी, गांधीनगर, अमेठी, नागपूर, लखनौ यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.