Pakistan election 2024 – पाक निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे सिद्ध करणारे दोन ऑडिओ संदेश आज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या ऑडिओमध्ये मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांचे संभाषण आहे.
यातील एका ऑडिओमध्ये सिंध प्रांताचे गव्हर्नर कमरान तेसोरी यांनी या निवडणुकीत एमक्यूएम पक्षाला मिळालेला जनादेश १०० टक्के खोटा आहे, असे म्हटल्याचे ऐकू येते आहे.
जेंव्हा आपण सिंध प्रांताचे गव्हर्नर बनलो तेंव्हा एमक्यूएम-पी पक्षाची इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाशी आघाडी झाली होती. जेंव्हा पाकिस्तान डेमोक्रॅटिक अलायन्सने सत्ता स्थापन केली, तेंव्हा एप्रिल २०२२ मध्ये एमक्यूएम-पी पक्षाने बाजू बदलून पीपीपी आणि पीएमएल-एन या पक्षांची साथ दिली होती.
पूर्वी २०१८ मध्ये एमक्यूएम-पी पक्षाला संसदेतील कराचीतील ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र ८ फेब्रुवारीच्या निवडणुकीत एमक्यूएम-पी पक्षाला तेवढी मते मिळाली नाहीत. केवळ खोट्या जनादेशाच्या आधारे विजय मिळाल्याचे तेसोरी म्हणाले आहेत.
लष्कर आणि पीएमएल-ने एमक्यूएम पक्षाला सत्तेत केवळ एक मंत्रीपद दिले आहे. तर ग्वहर्नर देखील बदलण्याची तयारी केली आहे. पीपीपीला मक्यूएमचे गव्हर्नर सिंधमध्ये नको आहेत, असेही तेसोरी म्हटल्याचे ऐकू येते आहे.
दुसर्या ऑडिओमध्ये मक्यूएम-पी पक्षाचे डेप्युटी गव्हर्नर मुस्तफा कमाल यांचे संभाषण आहे. पीपीपी आणि पीएमएल-एन मिळून एमक्यूएम-पी वर दबाव आणत आहेत. एमक्यूएम-पी चा जनादेश खोटा आहे, असे हे दोन्ही पक्षच म्हणत आहेत.
या दोनच पक्षांकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे सांगून सरकारमधील जास्त मंत्रीपदे आपल्या पक्षांना मागत आहेत, असे ते म्हणताना ऐकू येते आहे.या दोन्ही ऑडिओ संदेशांमुळे इम्रान खान करत असलेला निवडणुकीतील गैरप्रकारांचा आरोप खरा असल्याचा पुरावाच समोर आला आहे.