वॉशिंग्टन – स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स-एसएजीमध्ये, ओपेनहायमरने तीन आणि किलर्स ऑफ द फ्लॉवर मूनने एक प्रमुख पुरस्कार जिंकला आहे.
ओपेनहायमरमधील प्रमुख भूमिकेसाठी सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, रॉबर्ट डाउनी ज्युनियरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार आणि चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
लिली ग्लॅडस्टोनला किलर्स ऑफ द फ्लॉवर मूनसाठी सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्री आणि ड्वेन जॉय रँडॉल्फला तिच्या द होल्डोव्हर्समधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री बार्बरा स्ट्रीसँड यांना प्रदान करण्यात आला. या वर्षीचा एसएजी पुरस्कार सोहळा हा ओटीटीवर जगभरात दाखवला जाणारा पहिला पुरस्कार शो ठरला.