नगर, (प्रतिनिधी) – बजरंग दलाचे संयोजक कुणाल सुनील भंडारी (वय 30 रा. बुरूडगाव रस्ता, नगर) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी भंडारी यांनी शनिवारी (दि. २४) दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका मोबाईल नंबर धारक गुफरान कुरेशी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे. भंडारी कापड बाजार येथे असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून फोन आला व तो व्यक्ती म्हणाला,‘मैं गुफरान कुरेशी बोल रहा हु, तु ज्यादा शहाणा मत बन आजकाल तु बहुत हमारे जानवर पकडता, तुझे कहा काटकर फेक देंगे तुझे पता भी नही चलेगा’, असे म्हणून धमकी दिली.
दरम्यान यासंदर्भात भंडारी यांनी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भंडारी बजरंग दलाचे संयोजक असून गोरक्षक म्हणून काम करतात. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.