टायर्स मल्टी ब्रॅण्डेड शोरूम ग्राहकांच्या सेवेत रुजू
ओतूर – जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर येथे नामांकित बांगा टायर्स मल्टी ब्रँड शोरूमचे उद्घाटन शनिवारी (दि. 24) विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी याकोहामा टायरचे एजीएम नितीन कलदगी, अनुपम सिंग राणा, विजय सिन्हा उंदरे, विनायक पाटील, चरणजीत कौर बांगा, क्रितिका बांगा, विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे, यशराज काळे, विकी काकडे, उद्योजक प्रदीप मुरादे, प्रमोद बनकर, बबलू हिंगणे, समाजसेवक नितीन दांगट,बजरंग पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत डुंबरे,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जुन्नर तालुका अध्यक्ष तुषार थोरात, जयप्रकाश डुंबरे, बाळासाहेब होनराव, जवाहर गुगळे, दीपक म्हस्करे, देवाजी पटेल, गणीभाई मोमीन, बांधकाम व्यावसायिक संतोष जाधव, विवेक मुळे, अजय चोरडिया, दत्ता शिंगोटे, संपत शिंदे, अनिल मालानी, तेजाभाई पटेल, समीर इनामदार, डिंगोरे सरपंच शेखर बनकर, सुनील बटवाल, बाळू बनकर, गणेश बटवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
बांगा टायर्स मल्टी ब्रँड शोरूममध्ये याकोहामा सह विविध नामांकित कंपन्यांचे दुचाकी, चार चाकी, ट्रक व इतर सर्व प्रकारचे टायर उपलब्ध आहे अशी माहिती बांगा टायर्सचे के. एस. बांगा यांनी दिली. बांगा टायर्सच्या जुन्नर तालुक्यात नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, चाकण या ठिकाणी अधिकृत शोरूम आहे. या सर्व शाखांमध्ये थ्रीडी व्हील अलाइनमेंट, टायर फिटिंग, व्हील बॅलन्सिंग व नायट्रोजन सुविधा उपलब्ध आहेत.
चौथ्या टायरला 40 टक्के डिस्काउंट
बांगा टायर्स 1991 पासून विविध कंपन्यांच्या टायर्स विक्री सेवेत कार्यरत आहे. ओतूर येथील नवीन शोरूमच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांना तीन टायर्सच्या खरेदीवर चौथ्या टायरला 40 टक्के डिस्काउंट व आकर्षक भेटवस्तू, एक अलायनमेंट वर एक अलायनमेंट फ्री आशा विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. बांगा टायर्सकडून ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या ऑफर फक्त ओतूर शाखेसाठी असून त्याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत आहे. तरी ग्राहकांनी ओतूर शाखेला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन दिलदीप बांगा यांनी केले आहे.
याकोहामा टायर्सचे वैशिष्ट्य
* याकोहामा 115 वर्ष जुनी टायरची जापनीज कंपनी आहे.
* भारतामध्ये हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या चार ठिकाणी उत्पादन करत आहे.
* सर्वात जास्त चालणारे टायर्स अशी याकोहामा टायर्स कंपनीची ओळख आहे.
* याकोहामा टायर हा अत्यंत विश्वास दर्शक टायर आहे. जो पंक्चर विरोधी गुणांनी संपन्न आहे.
* याकोहामा टायर 5 वर्ष वॉरंटी सहित येतो.