twinkle khanna । अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच तिच्या लेखन कौशल्यामुळे चर्चेत असते. ट्विंकल खन्नाने व्हॅलेंटाइन डेच्या आधी एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. ट्विंकलने व्हॅलेंटाईन डे वर आपले विचार शेअर केले आहे.
ट्विंकल तिच्या विनोदी इंस्टाग्राम कॅप्शनसाठी ओळखली जाते. जगभरात साजरा होत असलेल्या व्हॅलेंटाईन डेवर ट्विंकलने प्रतिक्रिया दिली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिने गंमतीने सांगितले की,’नवरा बायकोला काय गिफ्ट देतात हे तिला माहीत आहे?’ अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावरही हे कपल खूप सक्रिय आहे.
View this post on Instagram
व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो यावर विचार करत ट्विंकलने लिहिले, ‘ज्या महिलांचे लग्न एका दशकापेक्षा जास्त झाले आहे त्यांना विचाराल तर, व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या पतीने तुम्हाला काय दिले? तर त्याचे सर्वात प्रामाणिक उत्तर असेल, ‘नेहमीप्रमाणे, डोकेदुखी.’ प्रेमामुळे नातं खूप घट्ट होतं. ते सुकलेले लाल गुलाब आणि दोन कार्टून ह्रदये एकमेकांकडे पाहत असलेले कार्ड असो वा नसो. भारतीय पती आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात, त्यामुळे त्यांची डोकेदुखी बनणे हे आपल्यासाठी व्हॅलेंटाईन डे गिफ्टपेक्षा कमी नाही.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न केले होते. हे जोडपे एक मुलगा आणि एक मुलगी आरव आणि नितारा यांचे पालक आहे. ट्विंकल खन्ना ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तिच्या सशक्त पात्रांसाठी ओळखली जाते. ‘बरसात’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.