ED summoned Sameer Wankhede । एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर सुपरस्टार शाहरुख खान यांच्या मुलाची कार्डेलिया क्रूझ प्रकरणातून सोडवणूक करण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. आता पुन्हा एकदा ईडीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ED registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede. ED has now started an investigation into the money laundering case against Sameer Wankhede. ED has also summoned three NCB officers for questioning: Enforcement Directorate
— ANI (@ANI) February 10, 2024
मिळलेल्या माहितीनुसार, कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर याआधी झालेला आहे. अशात ईडीने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने आता समीर वानखेडेविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईडीने एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
तत्पूर्वी, सीबीआयने वानखेडे आणि इतर चार जणांवर 11 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तक्रारीवरून गुन्हेगारी कट आणि खंडणीची धमकी या गुन्ह्यांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा
समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी