Aditya Thackeray on Abhishek Ghosalkar – आणखी एका गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. दहिसर येथे घडलेल्या या घटनेमध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये गुंडाराज सुरु असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
राज्यामध्ये गोळीबाराची प्रकरणे वाढत आहेत. अभिषेक यांच्यासोबत आज सायंकाळीच भेट झाली होती, यानंतर त्यांच्यासोबत जे झालं त्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. कायद्याचा धाक नसल्याने अशी प्रकाराने वाढत आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
प्राप्त माहितीनुसार, गोळीबाराची घटना पैशांच्या वादातून घडली आहे. घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने स्वतःवर देखील गोळ्या झाडात आत्महत्या केली आहे. | Aditya Thackeray on Abhishek Ghosalkar –
घोसाळकर यांच्यावर दहिसर येथील करुणा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तीन गोळ्या लागलेले घोसाळकर सध्या अत्यवस्थ असल्याचं समजतंय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. राज्यभरामध्ये या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता दहिसर येथे देखील गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. | Aditya Thackeray on Abhishek Ghosalkar –
या संपूर्ण गोळीबार प्रकरणाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वीचा आहे. गोळीबार करणारा इसम मॉरिस नोरोऱ्हा व घोसाळकर यांनी घटनेपूर्वी फेसबुक लाईव्ह केलं होत.
या व्हिडिओमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरून गोळ्या झाडण्यात आल्याचं दिसतंय. एक गोळी घोसाळकर यांच्या थेट पोटात घुसल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
घोसाळकर गोळीबार प्रकरणामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधीपक्षातील नेते सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. | Aditya Thackeray on Abhishek Ghosalkar –
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी एका गोळीबार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला! यावेळी निशाण्यावर ठाकरे गटाचा नेता…
‘मला लाथाडायची भाषा करू लागले….’; छगन भुजबळांनी सांगितलं राजीनामा देण्यामागचं खरं कारण