Rahul Gandhi काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी जातीत जन्माला आले नाही. त्यांच्या जन्म गुजरातच्या तेली समाजात झाला होता. जी त्यावेळी एक जनरल कास्ट होती. राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजप पक्षाने २००० मध्ये या जातीला ओबीसीचा टैग दिला.
PM Modi not born as OBC, belongs to general caste: Rahul Gandhi
Read @ANI Story | https://t.co/fK8YbFZaad#RahulGandhi #PMModi #OBC pic.twitter.com/JlLt56ek5p
— ANI Digital (@ani_digital) February 8, 2024
राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान मोदींवर जातीवरून गंभीर आरोप लगावले. ओडिसा येथील झारसुगुड़ामध्ये राहुल गांधी पुढे म्हणाले, मोदींचा जन्म ओबीसी वर्गात झाला नाही. त्यांच्या जन्म गुजरातच्या तेली समाजात झाला होता. जी त्यावेळी एक जनरल कास्ट होती. मोदी कधीच जाती जनगणना होऊ देणार नाही, कारण ते ओबीसी जाती जन्माला आले नाही.
राहुल गांधींच्या या आरोपावर भाजप नेते, केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले,’राहुल गांधींनी आधी जाती बाबत अधिक वाचन करायला हवे राहुल गांधी जाती जनगणना बाबत बोलत असतात. राहुल गांधींना जाती बाबत माहिती नाही, देशातील समाजाबाबतही त्यांना माहिती नाही, ते नेहमीच विचार न करता बोलत असतात.