Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात रामलल्लाचे आगमन झाले आहे. त्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक मंदिरात येत आहेत. दरम्यान, रामललाची मूर्ती मंदिरात बसवल्यानंतर ती स्वतः बनवणारे शिल्पकार योगीराज तिचे रूप पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
मूर्तिकार योगीराज यांनी सांगितले की, जेव्हा मी गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती अभिषेक दिनी पाहिली तेव्हा मला विश्वास बसला नाही की मी बनवलेली ही तीच मूर्ती आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगीराज यांनी हा दावा केला आहे.
मुलाखतीत योगीराज म्हणाले की, अभिषेक झाल्यानंतर मी गर्भगृहात गेलो तेव्हा तिथली मूर्ती पाहिल्यानंतर मला विश्वासच बसेना की ही मी बनवलेली मूर्ती आहे. यावेळी मूर्तीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसत असल्याचे त्यांनी म्हंटले. योगीराज म्हणाले पुढे म्हणाले,रामलल्लाच्या मूर्तीचा गर्भगृहात प्रवेश होताच तिचा कायापालट झाला जणू ती मूर्ती बोलत आहे असं वाटू लागलं अशी भावूक प्रतिक्रिया योगीराज यांनी यावेळी दिली.
याआधी योगीराज म्हणाले होते, “मला नेहमीच असे वाटत आले आहे की प्रभू राम माझे आणि माझ्या कुटुंबाचे प्रत्येक वाईट काळापासून रक्षण करत आहेत आणि त्यांनीच मला या शुभ कार्यासाठी निवडले आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.”