इस्लामाबाद – इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन-अमिर अब्दुल्लाहियान हे २९ जानेवारीला पाकिस्तानच्या दौर् यावर जाणर आहेत. इराणने बलुचिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यांना पाकिस्तानकडूनही तसेच प्रत्युत्तर दिल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभुमीवर हा दौरा होणार आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलिल अब्बास जिलानी यांच्या निमंत्रणावरून अब्दुल्लाहियान पाकिस्तानला जाणार आहेत. इराण आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयांचे हे संयुक्त निवेदन पाक पररा,ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अलिकडे फोनवरून केलेल्या चर्चेमध्ये एकमेकांच्या देशांना भेट देण्यावर एकमत झाले होते. दोन्ही देशांनी आपापल्या राजदूतांना माघारी बोलावले आहेत. त्यांनाही २६ जानेवारी रोजी पुन्हा परस्परांकडे नियुक्त करण्यावर एकमत झाले आहे.