पिंपरी – अयोध्येतील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अवघी उद्योगनगरी राममय झाली असून हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. त्याचबरोबर सजावटीसाठी देखील विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. विविध प्रकारच्या राम मूर्ती, झेंडे, आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजली आहे.
श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे अनेकांनी मंदिराची स्वच्छता साफसफाई करण्यात आली आहे. तसेच मंदिरांवर तर काहींनी घरावरदेखील सजावट तसेच विद्युत रोषणाई केली आहे. बाजारपेठेत देखील राममंदिराच्या प्रतिकृतीसह विविध वस्तू, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या प्रतिमा, झेंडे, तोरण, कापडी झेंडे, मफलर, टोपी, स्टिकर अशा वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच त्यांना मागणीही वाढली असल्याचे दुकान विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर काहींनी अतिषबाजीसाठी फटाक्यांची खरेदी करून ठेवली आहे. शहरातील दुचाकी, तीनचाकी व चारचाकींवर भगवे ध्वज फडकताना दिसत आहे.
श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची विविध संस्था संघटनांच्या वतीने रविवारी (दि.21) शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या शोभायात्रेत भजनी मंडळ, विद्यार्थ्यांचे लेझिम पथक यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
थेट प्रक्षेपणाचे आयोजन
प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातअ ाले आहे. सोबतच महाआरतीचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दुपारी होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्याची अनेक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.