Dharmaveer 2 : आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला मोठे यश मिळाले. यानंतर आता दिग्दर्शक प्रवीण तरडे ‘धर्मवीर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरू झाले असून या चित्रपटाबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके ‘धर्मवीर 2’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ऋतुराजने सोशल मीडियावर ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
ऋतुराज शेअर केलेल्या फोटोमध्ये तो दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर पाहायला मिळत आहे. सोबतच त्याने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टनंतर आता चाहते देखील त्याला या चित्रपटात पाहण्यास उत्सुक झाले आहेत. मात्र ऋतुराजने चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसले होते. तर ऋतुराज फडकने खलनायकाची भूमिका साकारली होती. या मालिकेशिवाय त्याने सहकुटुंब सहपरिवार, मोलकरीण बाई या मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच त्याने वाळण, मधु इथे अन चंद्र तिथे, झोल झाल या सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. सध्या तो ‘217 पद्मिनी धाम’ या नाटकात काम करत आहे. त्यानंतर आता तो ‘धर्मवीर 2’ चित्रपटात दिसणार असल्याने चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.