Uddhav Thackeray – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे त्यांनी 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करून हा सोहळा साजरा करण्याचे योजले आहे. या संबंधात उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
अशात आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांशी बोलतांना पुन्हा एकदा काळाराम मंदिराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. ‘मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही..’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंतप्रधान मोदी फक्त चाय वर चर्चा का करतात? त्यांनी कॉफी, बिस्किट फाफडावरही कधी चर्चा करावी. राम विराजमान होतायत, त्या बद्दल आम्ही दिवाळी साजरी करु.
पण देशाच जे दिवाळ काढतायत, त्यावरही चर्चा झाली पाहिजे. ते म्हणाले की, अटल सेतू बनवला. पण अटलजींचा फोटो नाही लावला. त्यामुळे राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की, नाही याची मला चिंता आहे..’ असं खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर जहरी टीका…
उद्धव ठाकरे म्हणाले, ’आपल्या देशाचा राम मंदिर सोहळा प्राण प्रतिष्ठा आहे. भाजपला आमची घराणेशाही नको पण गद्दारांची घराणेशाही मान्य आहे. शिंदेंच्या घराण्याला उमेदवारी दिली ही माझी चूक, निष्ठावंतांना डावलून त्यांना उमेदवारी दिली,
काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधरायची आहे. मीही सुधारणार आहे’ असेही ठाकरे म्हणाले