Accident – एका भीषण रस्ता अपघातात दिल्ली पोलिसांच्या दोन निरीक्षकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणातील सोनीपत येथे हा अपघात झाला. नॉर्थ वेस्ट डिस्ट्रिक्ट स्पेशल स्टाफमध्ये तैनात इन्स्पेक्टर दिनेश बेनिवाल आणि आदर्श नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात एटीओ इन्स्पेक्टर रणवीर अशी मृतांची नावे आहेत. कुंडली सीमेवर सोमवारी रात्री एका मालवाहू अवजड टँकरच्या धडकेने पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला.
ही टक्कर इतकी भीषण होती की, दिल्ली पोलिसांचे दोन्ही इन्स्पेक्टर वाहनातच अडकून पडले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या कडाक्याच्या थंडीसोबतच दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुकेही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत दृश्यमानताही बरीच कमी होते. सध्याच्या काळात रात्रीच्या वेळी होणारे अपघात हेच मुख्य कारण आहे.
रस्ते अपघाताच्या एफआयआरनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सोनीपतचे दोन्ही निरीक्षक काही कामासाठी जात होते. इन्स्पेक्टर दिनेश बेनिवाल गाडी चालवत होते. ते कुंडली सीमेजवळून जात असताना यूपी क्रमांकाच्या ट्रकने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे हा अपघात झाला. ट्रकने अचानक ब्रेक मारण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.