आढळराव पाटील : वारकरी शिक्षण संस्थेस दिली सचिच्छा भेट
आळंदी : श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेस व ग्रंथालयास सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी काठी असणार्या श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था गेल्या 25 वर्षांपासून अनाथ गरीब व गरजू मुलांचे पालनपोषण करीत आहे. संस्थेने सध्या 30 मुले दत्तक घेऊन त्यांचा पूर्ण खर्च संस्था करीत आहे. या संस्थेला आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे वेळोवेळी सहकार्य लाभते तसेच राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर या सर्वांचे लक्ष या संस्थेवरती असते.
या संस्थेतील मुलांसाठी काही करता येईल का या उद्देशाने या मंडळींनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी घेऊन आले त्यांचा फटाक्याच्या अतिशबाजी करून टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढून संस्थेच्या गेट वरती आल्यानंतर पाच सवाशनींनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे व कार्यवाह सोपानराव पवार, नरहरी महाराज चौधरी, हनुमंत देवकर, राहुल चव्हाण यांनी आढळराव पाटील यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी व मुख्यमंत्र्यांची तारीख मिळवून देण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, राज्य वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, सोपान पवार, राजेंद्र ढमाले, हनुमंत देवकर, संतोष गोफणे, पांडुरंग महाराज लाजूरकर, गणेश महाराज पुणेकर, सुनील वलेकर, साईनाथ ताम्हणे, नितीन ननवरे, ज्ञानेश्वर गारकर, वैभव गलधर, दीपक खेंडकर आदींसह नागरिक महिला मंडळ वारकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळरावांचे आश्वासन
राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे, त्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंबंधी चर्चा करून या अधिवेशनामध्ये वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मारुती महाराज कुरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करायचा आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट होऊन कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाहीर केले.