वाई : वाई पंचायत समिती शिक्षण विभाग व वाई तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या चित्रकारांनीवाई शहर व परिसर गजबजून गेला. या स्पर्धेत महाराष्ट विभागातून अनिकेत देवगिरकर, (मुंबई) याने प्रथम क्रमांक पटकावला.
वाई पंचायत समिती शिक्षण विभाग व वाई तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुंबई, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे, सातारा, नगर व जालना या जिल्ह्यातील चित्रकारांनी सहभाग घेतला. वाई शहर व परिसरातील जुने वाडे, मंदिरे, वास्तु यांची अनेक चित्रे चित्रकारांनी रेखाटली.
वाई पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्या प्रेरणेतून व कलाध्यापक संघाच्या प्रयत्नातून साकारलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून 125 पेक्षा जास्त निसर्गचित्रकार सहभागी झाले. या स्पर्धेत वाई व उर्वरित महाराष्ट्र असे दोन विभाग करण्यात आले.
यामध्ये वाई विभागतून प्रसाद वालेकर, भुईंज (प्रथम क्रमांक), सणथ जाधव, वाई (व्दितीय क्मांरक) आणि बानेश्वरी झावरे, वाई (तृतिय क्रमांक), तर उर्वरित महाराष्ट विभागातून अनिकेत देवगिरकर, मुंबई (प्रथम क्रमांक), औदुसिध्द करजगी, सांगली (व्दितीय क्रमांक), स्मित सोळंकी, मुंबई (तृतीय क्रमांक) आणि उत्तेजनार्थ मध्ये सुरज फरांदे, आयुष पालेकर, सचिन पन्ने, अजय साळवे या सर्व विजेत्या स्पर्धकांना माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, पंचायत समिती शिक्षणविस्तार अधिकारी वालेकर, जिल्हा कलाध्यापक संघ अध्यक्ष देशमुख, ज्येष्ठ चित्रकार होनराव, कोलार, विजय धुमाळ, वाई तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील फरांदे, ज्येष्ठ हस्तकला शिक्षिका सौ. विमल लोखंडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले.
या स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून कलाशिक्षक आनंदराव माने यांनी उत्तम नियोजन केले. तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष कलाशिक्षक सुनिल फरांदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वितेसाठी प्रसाद वालेकर, हेमंत शिंदे, महेंद्र पिसाळ, सुमित रोकडे, केंडे, विमल लोखंडे, सौ. प्रिती बागुल, बाळासाहेब कचरे, यशवंत सावंत, गावित यांनी अतिशय योगदान दिले.