Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचे देखील प्रेम मिळत आहे. नुकतेच सर्वांनी 2024 या नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. 2023 मधील काही कटू आठवणी आणि चांगल्या आठवणी शेअर केल्या आहेत. तेजश्री प्रधानने देखील सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर तिने आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
16 नोव्हेंबर रोजी अभिनेत्री तेजश्री प्रधान च्या आईचा दुःखद निधन झाले होते. त्यानंतर आता तिने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘तू तिथून मला पाहत आहेस हे मला माहित आहे. तू सर्व काही ठीक करशील, याच विश्वासाने मी माझं पूर्ण आयुष्य जगत राहणार.” सोबतच तिने स्वतःचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यावर अनेकांनी कमेंट करत तेजश्रीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
View this post on Instagram
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, छोट्या पड्यावरील ‘होणार सून मी या घराची’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली. आजही या मालिकेतील कलाकरांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. याशिवाय तिने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवर प्रेमाची गोष्ट याअ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. मालिकेत तेजश्री मुक्ता हे पात्र साकारत आहे. नुकताच या मालिकेत मुक्ता आणि सागर चा विवाह सोहळा पार पडला. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.