नवी दिल्ली – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आपल्या शत्रू रा,ट्रांना पुन्हा एकदा अण्वस्त्रांची धमकी दिली आहे. जर उत्तर कोरियाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला गेला, तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाने अलिकडेच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानिमित्ताने लष्कराच्या क्षेपणास्त्र ब्युरोच्या सैनिकांची त्यांनी आज भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासंदर्भात लष्कराने करून दाखवलेली कामगिरी ही उत्तर कोरियाच्या अण्व्स्त्रसज्जतेचे यथार्थ प्रदर्शन घडवणारी आहे. उत्तर कोरिया कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, हे या निमित्ताने कर्व जगाला समजले आहे. जर उत्तर कोरियाला अण्वस्त्रांच्या आधारे चिथावणी देण्याचा प्रकयत्न झाला तर आपली अण्वस्त्रे वापरण्यास उत्तर कोरिया मागेपुढे बघणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या दबावाखाली उत्तर कोरियाला धमकावू पाहणार् या देशांना आपली युद्धसज्जता दाखवून देण्यासाठीच उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टटिक क्षेपणास्त्र तयार केल्याचे ते मंगळवारी म्हणाले होते.