Indian Premier League Auction 2024 Live : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्कने 9 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन केले आणि IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपयांमध्ये मिचेल स्टार्कचा आपल्या कॅम्पमध्ये समावेश केला.
आयपीएल 2024 च्या लिलावात मिशेलचे नाव समोर आले तेव्हा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी बोली लावण्याची सुरुवात केली. दोघांच्या पर्समध्ये 11 कोटी रुपये शिल्लक होते. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने मिशेलला 10 कोटी रुपयांना विकत घेण्यापासून माघार घेतली. त्यानंतर केकेआरने लिलावात नवी एंट्री केली.
केकेआरने मिशेलवर 10.25 कोटी रुपयांची पहिली बोली लावली. केकेआरची एंट्री पाहून मुंबई इंडियन्सनेही स्वत:ला बाजूला ठेवले. त्यानंतर गुजरात टायटन्सने प्रवेश केला. स्टार्कला विकत घेण्यासाठी गुजरात आणि कोलकाता यांच्यात दीर्घ स्पर्धा होती. गुजरातने 24.50 कोटींची शेवटची बोली लावली. पण यापेक्षा जास्त बोली लावून केकेआरने विजय मिळवला आणि मिशेलला अखेर 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले.
Surreal 🫣
INR 24.75 Crore 💰#KKR fans, make way for Mitchell Starc who’s ready to bowl in 💜💛#IPLAuction | #IPL pic.twitter.com/E6dfoTngte
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
दरम्यान, मिशेल स्टार्कला RCB ने IPL 2014 च्या लिलावात $8,88,00 मध्ये खरेदी केले होते. मिशेल 2014 आणि 2015 मध्ये आरसीबीकडून खेळला होता. यानंतर, आयपीएल हंगामात दुखापतीमुळे तो आयपीएल 2016 मध्ये खेळू शकला नाही आणि त्यानंतर आरसीबीने त्याला सोडले.
यानंतर मिशेलने आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. मिशेलने नेहमीच आयपीएलपेक्षा देश निवडला. 2018 मध्ये, KKR ने मिशेलला $1.8 दशलक्षमध्ये खरेदी केले, परंतु स्टार्कने आयपीएल खेळण्यास नकार दिला. मिचेलने 2019 च्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे आयपीएल सोडले होते. मिशेलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 27 सामने खेळताना 34 विकेट घेतल्या आहेत.
मिचेल स्टार्कने आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून पॅट कमिन्सला मागे टाकले आहे. या लिलावात पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे.