Entertainment : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ 2022 साली रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. मोठ्या यशानंतर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी ही भूमिका हृतिक रोशन किंवा दाक्षिणात्य अभिनेता यश साकारणार असल्याची चर्चा देखील झाली होती.
‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगची निवड करण्यात आली आहे आणि ती भूमिका रणबीर कपूरचे वडील देव यांची आहे. या भूमिकेसाठी त्याला साइनही केले आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे कोणाच्याही नावाला दुजोरा मिळालेला नाही. परंतु रणवीर सिंगने ब्रह्मास्त्र पार्ट 2 मध्ये देवच्या भूमिकेसाठी होकार दिल्याचे म्हंटले जात आहे.
या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे स्क्रिप्टिंगचे काम अद्याप सुरु आहे आणि 2025 मध्ये चित्रपट रोलिंग सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सध्या अयान मुखर्जी ‘वॉर 2’मध्ये व्यस्त असून रणवीरही याच वर्षी ‘बैजू बावरा’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे ब्रह्मास्त्र 2 चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता रणबीर कपूर , नागार्जुन, मौनी रॉय आणि आलीय भट्ट यांच्या बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसून आली होती. बॉक्स ऑफिसवर देखील हा सिनेमा चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात 300 कोटी रुपयांची कमाई केली होती.