मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि पहिल्या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. नुकतेच निर्मात्यांनी ‘डंकी ड्रॉप 3’ हे चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज केले आहे. ‘निकले थे कभी हम घर से’ हे गाणे रिलीज होताच लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्याने किंग खानला त्याच्या आई-वडिलांची आठवण करून दिली आहे. स्वतः एसआरकेने याबाबत खुलासा केला आहे.(Dunki Movie)
‘डंकी’चे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. हे गाणे ऐकून अनेक सोशल मीडिया यूजर्स भावूक झाले आहेत. शाहरुखने देखील आपल्या या चित्रपटातील गाण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
किंग खानने सांगितले की, जेव्हा त्याने ‘निकले थे कभी हम घर से’ हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्याला आई-वडिलांची आठवण झाली. ‘आस्क एसआरके’ सत्रादरम्यान अभिनेत्याने याबाबतचा खुलासा केला आहे. एका चाहत्याने शाहरुखला विचारले, ‘सर, हे गाणे मला माझ्या घराची आठवण करून देते, पहिल्यांदा ऐकल्यावर तुम्हालाही असेच वाटले होते का?’
शाहरुख खानने या चाहत्याला उत्तर दिले, ‘होय, मला माझ्या आई-वडिलांचा, माझ्या दिल्लीच्या दिवसांची आठवण आली. या दरम्यान माझे अनेक मित्र बनले आणि काळानुसार हरवूनही गेले. खूप इमोशनल आहे. पुढे त्याने डंकी हा हॅशटॅग देखील वापरला. दुसर्या ट्विटमध्ये, एसआरकेने आपल्या पालकांना खूप मिस करत असल्याचे देखील म्हंटल आहे.
Yes it really makes me think about my parents…my Delhi days….friends made and lost in time. Very emotional #Dunki https://t.co/v13BWIn1CE
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 2, 2023
‘आस्क एसआरके’ सत्रादरम्यान, आणखी एका यूजरने एसआरकेला विचारले, ‘सर, तुम्हाला दिल्लीची आठवण येते का? तुमच्या बालपणाबद्दल सांगा? याला उत्तर देताना किंग खानने लिहिले की, ‘मी अजून लहान आहे. माझे बालपण खूप छान होते आणि मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डिंकी’ 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त विकी कौशल, बोमन इराणी आणि तापसी पन्नू सारखे कलाकार दिसणार आहेत.