Animal Movie : अभिनेता रणबीर कपूरचा ( ranbir kapoor ) ‘अॅनिमल’ ( Animal ) चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याची बरीच चर्चा होती. रणबीरला पहिल्यांदाच धमाकेदार गँगस्टर अवतारात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. टीझर-ट्रेलरवरूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगचाही रेकॉर्ड तोडला. हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ने रणबीर कपूरला अशा शैलीत पडद्यावर आणले आहे जे आजपर्यंत दुसरा कोणताही चित्रपट करू शकला नाही.
या जल्लोषात लोकांचा मूड इतका तयार झाला होता की चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू होताच तिकीटांची जोमाने विक्री सुरू झाली. त्यामुळे ‘अॅनिमल’ला मोठी ओपनिंग मिळणार हे निश्चित झाले होते, पण चित्रपटाला अपेक्षेपेक्षाही मोठी ओपनिंग मिळाली असल्याचं दिसून आलं आहे.
पहिल्याच दिवशी 60 कोटींहून अधिक कमाई केली असून, कमाईच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांच्या तुफान कमाईनंतर हा चित्रपट 200 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
बॉबी देओलच्या ( Bobby Deol ) दमदार अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे. अशातच नुकताच सोशल मीडियावर बॉबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी खूपच भावुक झाल्याचं दिसून आलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बॉबी देओल पापाराझींसमोर हात जोडून सर्व चाहत्यांचे अॅनिमल चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत आहे.
अॅनिमल चित्रपटाला मिळत असलेले प्रेक्षकांचे प्रेम पाहून बॉबी देओल खूप भावूक झाला. तो ढसाढसा रडू लागला. नंतर, तो कारमध्ये बसतो आणि त्याचे डोळे पुसतो. सध्या अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.