राहुरी – शहरातील एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन काॅलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेबाबत किरण कांबळे या तरुणावर संशयित म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील काॅलेज तरुणी देसवंडी परिसरात राहते. ती राहुरी शहरातील एका काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
दि. २५ नोव्हेंबर सकाळी सात वाजता तरुणी “मला आज कॉलेज मध्ये प्रॅक्टीकल आहे. त्यामुळे मी दुपारी दोन वाजे पर्यत घरी येईल.” असे सांगून सायकलवर कॉलेजला गेली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती घरी आली नाही. तरुणीचा शोध घेत असताना किरण कांबळे या तरुणाने अज्ञात कारणासाठी अपहरण करुन पळवून नेले[ असा संशय तरुणीच्या नातेवाईकांना आला. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण कांबळे (रा. श्रीरामपूर) याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.