नारायणगाव – गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस बाळगून दहशत निर्माण करणार्या ट्रकचालकास नारायणगाव पोलिसांनी जेरबंद केले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल गणपीर समोरील कालव्यावर टाटा कंपनीच्या ट्रकचा (एमएच 14 एचजी 7573) चालक शफिक रफिक सय्यद (वय 40 रा. जुन्नर हा गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन जाणार असल्याबाबतची माहिती नारायणगाव पोलिसांना शुक्रवारी (दि.24) रात्री मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहन चालकास ताब्यात घेतले. आणि पोलिसांनी वाहन चालकाकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार तावजी दाते करीत आहे.