नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये १.२५ लाख प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. त्याच्याशिवाय अनेक सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. (WorldCup 2023)
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतात. या दोघींशिवाय सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) दिसणार आहे.
रितिका आणि रिवाबा सुद्धा दिसतील
भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, अष्टपैलू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची प्रीती नारायण या सामन्यादरम्यान स्टँडवर दिसू शकतात.
टीम इंडिया बदला घेणार
2003 मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याकडे भारताचे लक्ष लागले आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पराभूत करून घेतला. आता सर्वांची नजर फायनल मॅचकडे लागली आहे. टीम इंडियाला 20 वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषकातील फायनलच्या पराभवाचा वचपा काढायचा आहे.