GT vs SRH : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पार सुरु आहे. दरम्यान हैदराबाद सनरायझर्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात काहीशी खराब झाली.
सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्सच्या डावाची सुरुवात केली. पाचव्या षटकात सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का बसला यावेळी बोर्डावर 34 रन्स लागलेले होते. मयंक अग्रवालला अजमतुल्ला उमरझाईने दर्शन नालकंडेच्या हाती झेलबाद केले. 17 चेंडूत 16 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. | GT vs SRH
त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का सातव्या ओव्हरमध्ये ५८ धावांवर बसला. IPL 2024 मध्ये पहिला सामना खेळत असलेला चायनामन फिरकीपटू नूर अहमदने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. हेडने 14 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. | GT vs SRH
दहाव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा २९ रन्स बनवून आऊट झाला आणि सनरायझर्सला तिसरा झटका बसला. दहा ओव्हर्सनंतर सनरायझर्सने ३ विकेट्स च्या बदल्यात बोर्डावर ७५ रन्स लावले होते. त्यानंतर क्लासेन आणि मार्कर्म मैदानात खेळत होता.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट. | GT vs SRH