चिंबळी – मोई (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या संचालकपदी जीवन सांडू येळवंडे यांची बिनविरोध निवड झाली, असल्याचे संस्थेचे सचिव निलेश देशमुख यांनी सांगितले.
मोई संस्थेच्या सर्व संचालक मंडळीार काम करण्याची संधी मिळावा या हेतूने माजी अध्यक्ष तथा संचालक मारुती येळवंडे यांनी स्वखुशीने राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी खेड तालुका कृर्षी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेण्यात आली.
यावेळी जीवन येळवंडे यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे बगाटे यांनी घोषित केले. यावेळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गवारे, काळूराम फलके, संभाजी गवारे, जालिंदर गवारे, चिंतामण रोकडे, भागवान साकोरे, सुरेखा गवारे, माजी उपसरपंच किरण गवारे,
रघूनाथ मोरे, सचिन येळवंडे, विशाल येळवंडे, प्रवीण येळवंडे, महादेव येळवंडे, दत्ता गवारे, तुषार येळवंडे, महेश येळवंडे, संतोष रोकडे, माजी अध्यक्ष मारुती येळवंडे आदी मान्यवरांसह नागरिकांनी नवनिर्वाचित संचालक जीवन येळवंडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
जरी संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी मी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहून आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखालील विविध योजना राबविणार असून जास्तीत जास्त पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– मारुती येळवंडे, माजी अध्यक्ष, मोई सोसायटी