पुणे – खडकवासला प्रकल्पा चारही धरणक्षेत्रांत कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी हंगामात पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने नियंत्रित पाणीवापर केल्यास चारा व ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी देणे शक्य होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने या बैठकीत सादर केली.
या बैठकीत जलसंपदा विभागाने उपलब्ध पाण्याचे वर्षभर म्हणजेच दि.15 जुलै 2024 पर्यंत पिण्यासाठी तसेच शेतीसाठीच्या पाण्याचे नियोजन केले आहे.
त्यानुसार पुणे शहर आणि दौंड नगरपालिकेसाठी मिळून एकूण 16.47 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. शेतीसाठी 8.54 टीएमसी इतके पाणी राखीव ठेवण्यात आला आहे.