नगर – नगर अर्बन बॅंकेमध्ये झालेल्या विविध अफरातफरी बोगस कर्ज प्रकरणासंबंधी कार्यक्षेत्रात दाखल गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्यांची मालमत्ता जप्त करून व ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदारांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बॅंकेचे सभासद राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, भैरवनाथ वाकळे, संध्या मेढे, ऍड.अच्युतराव पिंगळे, एस. झेड. देशमुख, सदा देवगावकर, महेश देवरे, दिनकर देशमुख, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले आदीसह ठेविदार मोठ्या संख्येने उपस्थित.
निवेदनात म्हंटले की, अर्बन बॅंकेतील चेअरमन संचालक मंडळ वरिष्ठ अधिकारी हे विविध घोटाळे व अफरातफरी करत असलेचे 17 फेब्रुवारी 2019 रोजी साडेचार वर्षांपूर्वी निदर्शनास आणून दिले होते. परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही.
त्यामुळे बॅंकेचे सभासदांना उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करावी लागली. व खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. दाखल गुन्ह्यातील सर्व कलमे अ जामीन पात्र होती. परंतु खात्याकडून कोणत्याही संचालकाला ताब्यात घेतले गेले नाही. यामुळे दि. 4 ऑक्टोंबर 2023 रोजी बॅंक बंद झाली. बॅंक बंद झाल्यामुळे गोरगरीब ठेवीदारांचे जवळपास 320 कोटी रुपये अडकले आहे.
कारवाई न झाल्याने बॅंक बंद पडली
कोतवाली पोलीस ठाण्यात चिल्लर घोटाळा, डमी जामीनदार घोटाळा, तोफखाना पोलिसात बनावट मूल्यांकन घोटाळा, शेवगाव पोलिसात बनावट सोनेतारण, राहता पोलीस ठाण्यात बॅंकेतर्फे तक्रार अर्ज, श्रीगोंदा पोलिसात बॅंकेतर्फे तक्रार तसेच महाराष्ट्र ठेव संरक्षण कायद्याअंतर्गत अनेक अर्ज असे अनेक गंभीर गुन्ह्याचे पोलीस दप्तरी नोंद असून देखील त्यावर कुठलेही ठोस कारवाई न झाल्यामुळे आज बॅंक बंद पडली आहे.