Priyanka Chaturvedi : आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा (Raghav chadha) यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. चड्ढा यांच्यावरील कारवाईवर शिवसेनाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून ‘राघव चड्ढा (Raghav chadha)यांच्यावर सूडबुद्धीची कारवाई’ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी चड्ढा(Raghav chadha) यांच्यावरील कारवाई विषयी बोलताना,”जर रेकॉर्ड तपासले तर बरेच लोक मुदत संपून देखील सरकारी बंगल्यातच राहत आहेत. तसेच अनेकांना अशी घरे मिळाली ज्यात ते वर्गात येत नाहीत. पण तरीही एकाच व्यक्तीला लक्ष्य करणे हे सत्ताधाऱ्यांची सूडबुद्धीतुन करण्यात आलेली कृती असल्याचा आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला.
#WATCH | Delhi: On orders for Raghav Chadha to vacate his bungalow, Shiv Sena (Uddhav Thackeray faction) MP Priyanka Chaturvedi says, “If the records are checked, it can be seen that a lot of people get out of term allotments… A lot of people get such houses that are not in… pic.twitter.com/EFIbdplC4F
— ANI (@ANI) October 7, 2023
आम आदमी पक्षाचे निलंबित खासदार राघव चढ्ढा (Raghav chadha) यांना उच्च श्रेणीतील बंगला देण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण राजकीय वादाचा विषय बनले आहे. आता त्यांना हा बंगला रिकामा करण्याचे आदेश मिळाले आहेत. वास्तविक राघव चढ्ढा (Raghav chadha) यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये टाइप 7 बंगला देण्यात आला होता. राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. मार्च 2023 मध्ये, सचिवालयाने प्रथमच राघव चढ्ढा (Raghav chadha) यांना टाइप 7 बंगल्याचा हक्क नसल्याचा युक्तिवाद करून वाटप रद्द केले होते.
त्यानुसार आता आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav chadha) यांना बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याने १८ एप्रिल रोजी अंतरिम जामिनासाठी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने बंगला खाली करण्यास बंदी घातली होती. 7 ऑक्टोबर रोजी स्थगिती उठवताना पटियाला हाऊस कोर्टाने सांगितले की चड्ढा (Raghav chadha) बंगल्यावरील पूर्ण हक्क सांगू शकत नाहीत.