Rajinikanth – थलायवा उर्फ रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
नुकताच सोशल मीडियावर रजनीकांत (Rajinikanth) यांच्या आगामी ‘थलायवर 170′ (Thalaivar 170) या चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, चित्रपटाचे हे पोस्टर शेअर करताना लायका प्रॉडक्शन यांनी लिहिले, “लाइट कॅमेरा क्लॅप आणि अॅक्शन. आमचा सुपरस्टार रजनीकांत आणि थलायवर 170 च्या अप्रतिम कलाकारांसह, टीम सर्व तयार आहे आणि रोल करण्यासाठी तयार आहे!
आशा आहे की तुम्ही सर्वांनी थलायवर मेजवानीचा आनंद घेतला असेल. शूटिंग जसजसे पुढे जाईल तसतसे आम्ही आणखी अपडेट्स आणू.’ या आशयाचे ट्विट लायका प्रॉडक्शन यांनी केले आहे.
Lights ☀️ Camera 📽️ Clap 🎬 & ACTION 💥
With our Superstar @rajinikanth 🌟 and the stellar cast of #Thalaivar170🕴🏼 the team is all fired up and ready to roll! 📽️
Hope you all enjoyed the #ThalaivarFeast 🍛 Now it’s time for some action! We’ll come up with more updates as the… pic.twitter.com/gPUXsPmvEQ
— Lyca Productions (@LycaProductions) October 4, 2023
रजनीकांतच्या लूक बद्दल बोलायचे तर तो काळा चष्मा आणि काळ्या रंगाचा सूट आणि काळा शर्ट घातलेला दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘थलायवर 170’ चित्रपटाचे नाव अद्याप पूर्णपणे निश्चित झालेले नाही.
निर्माते चित्रपटासाठी चांगले नाव शोधण्यात व्यस्त आहेत. चित्रपटाच्या कथेला चांगले नाव मिळताच ते त्याची घोषणा करणार आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे रजनीकांत आणि अमिताभ बच्चन 32 वर्षांनंतर एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.
या दोन मेगास्टार्सशिवाय रितिका सिंग, मंजू वॉरियर, तुषारा विजयन, राणा दग्गुबती आणि फहद फासिल हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे.