Pushpa 2 New Poster| दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू झाली आहे. सध्या पुष्पा… पुष्पा… पुष्पराज हे या चित्रपटाचे पहिले गाणे सोशलवर ट्रेंड करत आहे. यानंतर आता नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची रोमँटिक अंदाज यात पाहायला मिळत आहे. याशिवाय निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन गाण्याच्या रिलीजची माहिती देखील शेअर केली आहे.
‘पुष्पा 2’ च्या निर्मात्यांनी एक्स अकाऊंटवर एक नवीन पोस्ट शेअर केले आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या पोस्टरमधील अल्लूची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे. तसेच रश्मिकाने इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. या पोस्टरमध्ये दोघांना पाहता हे रोमँटिक कपलचे गाणे असेल असा अंदाज लावला जात आहे.
Pushpa Raj ❤🔥 Srivalli
INDIA KA FAVOURITE JODI are coming to mesmerize us all with #TheCoupleSong 💃🏻🕺#Pushpa2SecondSingle Out tomorrow at 11.07 AM 👌A Rockstar @ThisIsDSP Musical 🎵
Sung by @shreyaghoshal ✨#Pushpa2TheRule Grand release worldwide on 15th AUG 2024.… pic.twitter.com/6X11oLtEKI— Pushpa (@PushpaMovie) May 28, 2024
काही वेळापूर्वीच शेअर केलेल्या या नवीन पोस्टरसह, निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन गाण्याच्या रिलीजची माहिती देखील शेअर केली आहे. “भारताची सर्वात आवडती जोडी लवकरच ‘कपल सॉन्ग’ घेऊन येत आहे. पुष्पा 2 चे दुसरे गाणे उद्या म्हणजेच 29 मे रोजी सकाळी 11.07 वाजता रिलीज होणार आहे.” विशेष म्हणजे हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. Pushpa 2 New Poster|
दरम्यान, सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना यात श्रीवल्लीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पुष्पा 2 च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. Pushpa 2 New Poster|
हेही वाचा:
मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळली ; दहा जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता