नवी दिल्ली : डान्स रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’ (‘India’s Best Dancer Season 3’) चा नुकताच अंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेल्या या शोचा पुण्याच्या समर्पण लामाने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चा किताब मिळाला आहे. तिच्या या विजयानंतर त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या अंतिम सोहळ्यात एकूण 5 स्पर्धक होते. त्यांच्यावर मात करत समर्पण या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
समर्पणला शोच्या चमकदार सुंदर ट्रॉफीसोबतच तिला 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले. त्याचबरोबर त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजा हिलाही या विजयासाठी 5 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हे असे व्यासपीठ आहे जिथे विजेत्यांसोबतच त्यांच्या नृत्यदिग्दर्शकांनाही सादरीकरणासाठी सन्मानित केले जाते.
या फिनाले रेसमध्ये समर्पण लामा यांच्यासह शिवांशू सोनी, अंजली ममगाई, विपुल कंदपाल आणि अनिकेत चौहान हे देखील टॉप 5 स्पर्धक बनले आहेत. अंजली ममगाई ही फर्स्ट रनर अप, तर शिवांशू सोनी सेकंड रनर अप ठरली. तर विजेते म्हणून समर्पणच्या नावाची घोषणा करण्यात आली.
View this post on Instagram
‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’चं विजेतेपद पटकावल्यानंतर समर्पणने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “माझ्या प्रियजनांनो शेवटी आपण जिंकलोच, ज्यांनी मला मत दिलं त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.” त्याच्या या पोस्टनंतर त्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, शनिवारी 30 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रँड फिनालेच्या निमित्ताने, गीता कपूर आणि सोनाली बेंद्रे जजच्या भूमिकेत होते. मात्र या शोचे तिसरे जज टेरेन्स लुईस, गायब असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या फिनालेमध्ये अभिनेता गोविंद, टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन देखील काही काळ शोचा भाग बनले होते.