नवी दिल्ली – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची (Nationalist Congress Party) जंबो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीत 35 सदस्यांचा समावेश आहे. 14 सदस्य, 10 स्थायी आमंत्रित आणि 11 विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे (अजित गट) महासचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 35 सदस्य आहेत. यात अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. सहा महासचिवांचा समावेश करण्यात आला आहे.
यात खा. सुनील तटकरे, बृजमोहन श्रीवास्तव, एस.आर.कोहली, के.के.शर्मा, वाई.पी.त्रिवेदी, सैयद जलालुद्दीन वकील आणि एन.ए.मोहम्मद कुट्टी यांचा समावेश आहे. याशिवाय, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, कमलेश कुमार सिंह, वांथुंगो ओड्यू यांचा समावेश आहे.
स्थायी आमंत्रित सदस्य माजी खा. मधुकर कुकरे, रामराजे निंबाळकर, धर्म राव आत्राम, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, संजय बानसोड, आदिती तटकरे, अनिल पाटिल, राजेंद्र जैन आणि विश्वजीत चंपावत.
विशेष आमंत्रित सदस्य सच्चिदानंद सिंह, संजय कुमार सिंह, राजेंद्र शर्मा, शिवाजीराव गरजे, प्रताप चौधरी, पी.के.नरेश, अमिया सरकार, संजय प्रजापति, ओमिलो के. संगमा, सलाम जॉय सिंह आणि नवीन कुमार सिन्हा.( National Executive of Nationalist Congress Party)