Entertainment – बॉलीवुड एक्ट्रेस जैकलीन फर्नांडिस एका व्हायरल फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे, व्हायरल फोटोमध्ये जैकलीन हॉलीवूड फेमस सिंगर सेलेना गोमेजसह काही फ्रेंड्स सोबत चिल करतांना दिसत आहे. या फोटोवरून आता फॅन्स अनेक अंदाज बाधत आहे. काही चाहते विचारत आहे की हा फोटो कधीचा आहे तर काही हा फोटो कुठला आहे असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. ( Jacqueline Fernandez , Selena Gomez )
जैकलीन फर्नांडिसचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या फोटोमुळे चर्चाना उधाण आले आहे. इंटरनेशनल सेंसेशन सेलेना गोमेज, कॅरोलिन फ्रँकलिन आणि इतर काही मित्रांसोबत दिसून येत आहे. या फोटोवरून काही चाहते अंदाज लावत आहे की हे या दोघी एकत्र काम करणार आहे. कॅरोलिन फ्रँकलिनने हा फोटो शेअर केला आहे. हे फोटो टस्कनी शहरातील आहे
या फोटो जैकलीनचा मेकअप आर्टिस्ट सुद्धा दिसतोय. या फोटोवर तिनेही कॉमेंट केली आहे. जॅकलिन फर्नांडिस इटलीमध्ये सुट्टी घालवत आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मित्रांसोबत एन्जॉय करत आहे. या दरम्यानचा हा एक फोटो सध्या सोशल व्हायरल झाला आहे.
जैकलीन जुड़वा 2, रेस 2, ठिशूम, हाउसफुल 3, किक और राम सेतु सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. वर्कफ्रंट बाबत सांगायचं झाल्यास, जैकलीन फर्नांडिस ‘वेलकम टू द जंगल’ दिसणार आहे. अक्षय कुमार, रवीना टंडन, लारा दत्ता, दिशा पाटनी, सुनील शेट्टी, तुषार कपूर, श्रेयस तलपड़े, संजय दत्त, अरशद वारसी, परेश रावलसह अन्य कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. ( Jacqueline Fernandez , Selena Gomez )