आळंदी – विश्रांतवड परिसरातील लक्ष्मीनगर (चऱ्होली खुर्द) येथे लोकवर्गणीतून हनुमान मंदिर उभारण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 1) मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. लवकरच मंदिर उभारणीचे काम सुरू होणार आहे. मंदिर उभारणीसाठी येथील ज्ञानेश्वर पगडे यांनी स्वमालकीची एक गुंठा जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच पुण्यभूमी डेव्हलपर्सचे सुशांत थोरवे यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, कुरूळीचे सरपंच चंदन मुऱ्हे, पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम वहिले, चऱ्होलीचे युवा नेते प्रताप थोरवे, उपसरपंच पांडुरंग थोरवे, माजी उपसरपंच निखील थोरवे, माजी सरपंच काळुराम थोरवे, योगेश थोरवे, शिवाजी थोरवे, नागेश थोरवे, आकश थोरवे, माणिक थोरवे, विलास थोरवे, योगेश पगडे, शिवाजी पगडे, रंजीत पगडे, हनुमंत थोरवे, आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रवि खेडकर, गजानन आडे, हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पगडे, उपाध्यक्ष अर्जुन थोरवे, सचिव शिवाजी धुळगंड, खजिनदार भाऊसाहेब माळशिखरे यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.