मुंबई – मराठमोळी अभिनेत्री स्मिता शेवाळेचा नुकताच ”सुभेदार’ हा सचित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे हा सिनेमा सुपरहिट ठरत असताना स्मिताने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. स्मिता शेवाळेने नुकतंच तिच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. स्मिताने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या घराची झलक दाखवली आहे.
इनस्टाग्रामवर गृहप्रवेशाचे व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. पोस्ट करत तिने लिहिले की, ‘घर म्हणजे केवळ घर नसतं, असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं….आपुलकीच्या झुरोक्यातून इथे प्रेमाचं वारं वाहत असतं…,’ असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सुभेदार हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. सुभेदार सिनेमात तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भुमिका अभिनेत्री स्मिता शेवाळेने साकारली आहे. तिच्या यातील अभिनयाने सर्वांची मन जिंकली आहे.
View this post on Instagram
स्मिताने ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटात काम केले आहे. यासह तिने ‘मुरांबा’, ‘अथांग’, ‘कनिका’, ‘चल लव्ह कर’, ‘धामधूम’, ‘विठ्ठला’, ‘चारचौघी’, ‘वीर शिवाजी’ या मालिका आणि सिनेमांमध्येही काम केले आहे. सध्या ती सुभेदार चित्रपटामुळे अधिक चर्चेत आली आहे.