मुंबई – बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान त्यांच्या आगळ्या वेगळ्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच त्याचा भाऊ अरबाज खानच्या 56 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला तो उपस्थित होता. जिथे त्याने कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी पापाराझींसमोर पोज दिली. सलमानने पिंक कलरचा डेनिम सोबत ब्लॅक टी-शर्ट, ग्रे जॅकेट आणि ब्लॅक शूज घातला होता. त्याच्या या कपड्यांची आता जोरात चर्चा होत आहे. चाहत्यांनी त्याचे कनेक्शन ‘बार्बी’शी जोडले आहे.
सलमान खानने पापाराझींसमोर पोज दिली. त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, ‘भाईजान क्या ये पैंट बार्बी से इंस्पायर्ड हैं? दुसर्याने लिहिले, ‘तो एकटाच बार्बी ओपेनहायमरला प्रमोट करत आहे.’ एकाने विचारले की, सलमानही बार्बी चॅलेंज करतो का? सोशल चाहते आता सलमान खानला प्रश्न विचारत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सर्वजण सलमान खानच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित या फ्रेंचाइजीतील हा तिसरा चित्रपट आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यात कतरिना कैफचीही भूमिका आहे. शाहरुख खानचा कॅमिओ आहे.