मुंबई – सुलतान या चित्रपटाला नुकतेच ७ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट 6 जुलै 2016 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले.
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनुष्का शर्माने खुलासा केला की, ‘सुलतान’ची स्क्रिप्ट वाचण्यापूर्वी ती घाबरली होती. सलमानच्या चित्रपटात आपल्याला फारसे काही मिळणार नाही असे तिला वाटत होते. सलमानच्या चित्रपटात ती काय करणार? मात्र, याउलट सुलतानमधील अनुष्काचे पात्र आणि तिचा अभिनय सर्वांचं आवडला. अली अब्बासने 7 वर्षे पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाशी संबंधित सर्व लोक आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
एका मुलाखतीत अनुष्काला विचारण्यात आले की सुलतान चित्रपट साईन करण्यासाठी तिला सर्वात जास्त कशाने प्रभावित केले? यावर अनुष्का म्हणाली,’खर सांगू, स्क्रिप्ट मिळण्यापूर्वी मला माहित नव्हते की हा कोणत्या प्रकारचा चित्रपट असेल. आपल्या सगळ्यांना वाटतं, बरं मी पण विचार करत होते की सलमानच्या चित्रपटात माझी भूमिका काय असेल, मला काय करावं लागेल? मी खूप घाबरले, जरी मला आशा होती की आदित्य चोप्रा मला एक चांगली भूमिका देईल.’
अनुष्काने पुढे सांगितले की लोकांना, विशेषत: महिलांना तिचे पात्र कसे खूप आवडते. अनुष्का म्हणाली की मल्टीप्लेक्समध्ये तिच्या डायलॉग्ससाठी काही पॉश आंटी कशा टाळ्या वाजवू लागल्या हे तिला अनेकांनी सांगितले होते. अनुष्काचा असा विश्वास आहे की सर्व वयोगटातील, वर्ग आणि ठिकाणच्या स्त्रिया तिच्या पात्राशी संबंधित असू शकतात. सुलतान चित्रपटातील तिचे पात्र चांगलेच चर्चेत आले होते.