राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ (बारावी) खेड तालुक्याचा निकाल 92.57 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तालुक्यातील 6 इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. खेड तालुक्यातील बारावीच्या परीक्षेस 33 महाविद्यालयांचे 4 हजार 806 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 4 हजार 449 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यात 95.75 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर 87.96 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. बारावीच्या परीक्षेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दरवर्षी कमी कमी होत चालले आहे तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील 6 शाळांचे निकाल 100 टक्के लागलें आहेत. तालुक्यातील 299 विद्यार्थ्यांना डिस्टिक्शनमध्ये, 1217 प्रथम श्रेणी, 2249 द्वितीय श्रेणी तर 584 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात 357 विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत.
खेड तालुक्यातील शाळांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे- हुतात्मा राजगुरु महाविद्यालय (राजगुरुनगर)- 92.06 टक्के, कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज,(वाडा)-98.29 टक्के, सिताबाई पाटोळे ज्युनियर कॉलेज (चाकण)-95.06 टक्के, संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज (आळंदी)- 88.65 टक्के, म.फ.गायकवाड विद्यालय ज्युनियर कॉलेज (दावडी)- 86.20 टक्के, रामभाऊ म्हाळगी विद्यालय ज्युनियर कॉलेज (कडूस) 83.87 टक्के, सुमंत उच्चमाध्यमिक विद्यालय (पिंपरी बुद्रुक)- 74.19 टक्के, नविन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मरकळ)- 94.95 टक्के, शिवाजी विद्यालय (डेहणे)- 94.04 टक्के, रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय (आळंदी)- 84.61 – टक्के, आर्टस, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज (पाईट)- 86.13 टक्के,
नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय (काळूस)- 94.04- टक्के. महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज (राजगुरुनगर)- 99.18 टक्के, श्री भामचंद्र विद्यालय (भांबोली)- 97.16 टक्के, पी के कॉलेज कडाचीवाडी (चाकण)- 93.08 टक्के, उच्च माध्यमिक विद्यालय (वाशेरे) 96 टक्के, नवमेश विद्यालय (चाकण) 72.22 टक्के, बी एम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (बिरदवडी)-86.66 टक्के, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज (डेहणे)-89. 13 टक्के, आर्ट्स कॉमर्स कॉलेज (राजगुरुनगर)- 91.50 टक्के , शिवाजी विद्यामंदिर व सीताबाई भिकोब शेठ जुनिअर कॉलेज (चाकण)- 98.57 टक्के, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय (चिंबळी) 86.38 टक्के,
सुभाष माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज (खेड)- 87.50 टक्के, श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज(नाणेकरवाडी) 97.75 टक्के, ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज (खेड)- 88.33 टक्के. श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज (शेलपिंपळ्गाव) 94.38 टक्के, मॉडर्न हायस्कुल व जुनियर कॉलेज (भोसे)- 100 टक्के, प्रियदर्शनी इंग्लिश मेडीयम व ज्युनियर कॉलेज (आळंदी)- 100 टक्के, प्रियदर्शनी हायस्कूल ज्युनियर कॉलेज (वाकी) 100 टक्के, श्री एस जैद पाटील विद्या प्रशाला (चिंबळी)-100 टक्के डायनॅमिक इंग्लिश मेडीयम व ज्युनियर कॉलेज (कडूस)-100 टक्के. होली अंगल स्कूल ज्युनियर कॉलेज (खेड) 100 टक्के, आयटीआय (खेड ) 85.35 टक्के, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (खेड) 93.50 टक्के.