चेन्नई – आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे साखळी सामने पार पडले असून आज चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स यांच्या क्लालिफायर ए सामना रंगणार आहे. एकीकडे महेंद्रसिंह धोनीच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला शुभमन गिल भरात असल्यामुळे सामन्यात त्यांचेच पारडे जड राहणार असल्याचा विश्वास आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द गुजरात टायटन्स यांच्यातील क्लालिफायर ए सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss) हा गुजरात टायटन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने क्षेत्ररक्षण स्विकारताना चेन्नई सुपर किंग्स संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
🚨 Toss Update 🚨@gujarat_titans win the toss and elect to field first against @ChennaiIPL.
Follow the match ▶️ https://t.co/LRYaj7cLY9 #TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK pic.twitter.com/Bhj5g0Gv30
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत साखळीतील 14 पैकी 10 सामने जिंकत गुजरातने संपूर्ण वर्चस्व राखत 20 गुणांसह थाटात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तर चेन्नईने 4 पैकी 8 सामने जिंकले तसेच एका सामन्यात निकाल न लागल्याने एक गुण मिळाला असे 17 गुण मिळवत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले.
आता या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामना खेळणार असून पराभूत होणारा संघ क्लालिफायर 1 सामना खेळणार आहे. गुजरातचे पारडे जड राहणार असे दिसत असले तरीही धोनीच्या संघाने स्पर्धेचे चारवेळा विजेतेपद मिळवले आहे.
गुजरातने सलग दुसऱ्या वर्षी क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी त्यांचा संघ स्पर्धेत पदार्पण करत होता तरीही त्यांनी विजेतेपद पटकावले. आता यंदा धोनी पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी सज्ज बनला असला तरीही त्याला पंड्याच्या गुजरातचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.