मुंबई – ‘RRR’ फेम साऊथ सुपरस्टार राम चरण श्रीनगर येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेचा एक भाग आहे. भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारा अभिनेता रामचरण हा पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. रामचरण भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध लोकशाहीमध्ये चित्रपट पर्यटनावर सखोल चर्चा करणार असल्याचे समजते. यावेळी रामचरणने हॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रामचरण हे साऊथ इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. काही दिवसांपूर्वी राम चरणने स्वतः हॉलिवूडमध्ये पदार्पण होणार असल्याचे संकेत दिले होते. याबाबत एक प्रोजेक्ट सुरु असल्याचं तो म्हणाला होता. याबाबत बोलताना तो म्हणाला,याबातची चहरचा सुरु आहे. सध्या मी एका सेटवर जात आहे. लवकरच याबाबतची माहिती समोर येईल. यानंतर आता पुन्हा एकदा रामचरणने हॉलीवूडबाबत भाष्य केले आहे.
राम चरणने हॉलिवूडमधून ऑफर आल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना रामचरणने बॉलिवूड पेक्षाही आपण हॉलीवूडला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संस्कृतीवर प्रेम असल्याचे त्याने यावेळी सांगितले. अभिनेता म्हणाला, “मला भारत अधिक एक्सप्लोर करायचा आहे. मला नाही वाटत चित्रपटांसाठी मी आणखी दुसरीकडे जाईल.मी आपल्या संस्कृतीशी जोडून राहणार आहे. आपल्या कथा खूप मोठ्या आहेत. हा सिनेमा केवळ दक्षिण उत्तर सिनेमा असा नाही. पण जर दिग्दर्शक किंवा निर्माता हॉलीवूडचा असेल तरच मी दुसरा विचार करू शकतो.
रामचरणच्या या व्यक्तव्यानंतर साऊथ इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा त्याच्या हॉलिवूड एंट्रीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आर आर आर नंतर अभिनेता रामचरण त्याच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.