मुंबई – बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटातील त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर गेले आहेत. सोनू सूद लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळत असून, त्याचा हा लुक सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या चित्रपटात सोनू सोबतच अभिनेता ‘रामचरण’ आणि’ चिरंजीवी’ही पाहायला मिळणार आहेत. रामचरण आणि चिरंजीवी हे जुळे भाऊ असतील अशी माहिती आहे. चित्रपटात सोनू देखील एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षांपासून हा चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. आणि अखेर काल चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला.
See you soon 💫 #acharya pic.twitter.com/sXOJVzXFkQ
— sonu sood (@SonuSood) April 27, 2022
अभिनेता सोनू सूदने फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील दिल आहे. “लवकरच भेटूयात… #acharya’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिला आहेत. दरम्यान, अभिनेता सोनू सूदने करोना काळात सामान्य नागरिकांसाठी अनेक मोठ्या प्रकारे मदतीचा हात पुढे केला होता.