अकोला – महाराष्ट्रातील अकोल्यात दोन समाजातील लोकांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर जोरदार दगडफेक झाली. यादरम्यान दंगलखोरांनी अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. तेथे अनेक वाहने जाळण्यात आली.
या घटनेत दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा परिसरात दाखल झाला. येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील अकोल्यातील इन्स्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली होती, त्यामुळे अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिस ठाण्यात आलेला जमाव अनियंत्रित झाला आणि त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली.
या दंगलीविषयी माहिती देताना अकोल्याचे स्थानिक पोलीस म्हणाले, ‘रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक शुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांची तोडफोड सुरु केली, काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला.’
अकोल्यातील संमीश्र वस्ती असलेल्या भागात कलम १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.